CJP PM Modi and Sandeep Deshpande: झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
CJP PM Modi: आज मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा, संदीप देशपांडे यांची भाजपला डिवचणारी पोस्ट. मुंबईतील आजच्या मोर्चाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

CJP PM Modi and Sandeep Deshpande: दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या प्रचंड रेट्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. हा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला असून आता भाजपचे नेते प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) हे हंगामी शिक्षणमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणारी अनेक मिम्स आणि पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या सगळ्यात आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उडी घेतली आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या माध्यमातून त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये झुरळ मारण्याच्या स्प्रेवर नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे. या फोटोसोबत 'झुरळांनी बेगॉनला हरवलं', असे कॅप्शन संदीप देशपांडे यांनी लिहले आहे. संदीप देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. (Dharmendra Pradhan Resignation)
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, काल धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुंबईत विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा आनंद साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे हे सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. हुकूमशाहीला झुकवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच अभिनंदन, अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी काल केली होती. पंतप्रधान महोदय तुमची नाटक आणि नाटकीय व्हिडिओ बस्स झाले तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर जनता पंतप्रधानांचा राजीनामा घेईल.धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात, अशी टीकाही त्यांनी केली होती.
झुरळांनी बेगॉन ला हरवलं pic.twitter.com/xocwfbaIOD
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2026
संदीप देशपांडे हे आजच्या मुंबईतील आंदोलनात एक टी-शर्ट घालून उतरणार आहेत. या टी-शर्टवर पंतप्रधान मोदी यांचा मॉर्फ केलेला फोटो असून त्यावर 'झुटलर' असे लिहले आहे.
आणखी वाचा
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..





















