एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?

जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत उणे 15 टक्के पावसाची नोंद झाली

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय (Low Pressure Area) झाले असून येत्या दोन दिवसात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे.  जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत उणे 15 टक्के पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात 01 जुलै ते 25 जुलै दरम्यान, सरासरीच्या उणे 3 टक्के पाऊस झाला.  पुढील दोन दिवस राज्यभरात पावसाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. दक्षिण कोकण गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain)

हवामान विभागाचा अंदाज काय? 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी पुढील दोन दिवस, तळ कोकणासह कोकण किनारपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने आज पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला असून, रायगड रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा तसेच ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात पावसाचा टक्का घसरला

जुलै महिन्यात महाराष्ट्रभरात काही जिल्हे वगळता बहुतांश ठिकाणी पावसाने हुलकावणीच दिली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत उणे 33% कमी पाऊस झालाय. तर विदर्भात पुढे 26 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत + 22 टक्के पावसाची नोंद झाली. तर कोकणात +4% पाऊस झाला. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टीची नोंद होताना दिसते. यामागे अनेक कारणे असून वातावरणातील, मान्सूनच्या प्रणालीमध्ये झालेले बदल यासाठी कारणीभूत असून एल निनो, ला निना यासारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते, प्रदूषण या सगळ्याचा परिणाम पावसावर होतोय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Advertisement

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget