एक्स्प्लोर
Advertisement
'पनवेल' जिंकण्यासाठी शिवसेनेला स्वाभिमानीची साथ!
पनवेल : शिवसेना पनवेल महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. यामध्ये त्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ मिळणार आहे. शिवसेना पनवेल महापालिकेच्या सर्वच्या सर्व 78 जागा लढवणार आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मागे उभी राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शहरी भाग असलेल्या पनवेलमध्ये स्वाभिमानीची फारशी ताकद नसली तरी पश्चिम महाराष्ट्रातील मोठा वर्ग येथे राहतो. त्यामुळे स्वाभिमानीची भूमिका शिवसेनेसाठी महत्वाची ठरु शकते.
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी सज्ज, जागावाटपही पूर्ण
शिवसेनेला स्वाभिमानीने साथ दिली असली तरी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी सज्ज झाली आहे. पनवेल महापालिका जिंकण्यासाठी महाआघाडीने कंबर कसली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत विरोधकांशी दोन हात करणार आहेत. यासाठी या महाआघीडचं जागावाटपही पूर्ण झालं आहे.
काँग्रेसची जास्त जागांची मागणी होत होती. अखेर महाआघाडीचे समन्वयक शेकाप नेते विवेक पाटील यांनी भाजपसमोर कडवं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना जागावाटपाबाबत नरमाईची भूमिका घेण्याचे आवाहन केल्यानंतर मार्ग सुकर झाला.
पनवेल महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. यामध्ये शेकाप 48, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महाआघाडी, भाजप आणि शिवसेना असा तिरंगी सामना पनवेल मनपात पाहायला मिळणार आहे.
पनवेल महापालिका निवडणूक कार्यक्रम :
- अर्ज दाखल करण्याची तारीख : 29 एप्रिल ते 6 मे
- अर्ज छाननी तारीख : 8 मे
- चिन्ह वाटप : 12 मे
- मतदानाची तारीख : 24 मे
- मतमोजणी : 26 मे
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या निवडणुका जाहीर
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा मेगाप्लॅन
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र
पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर, आ. प्रशांत ठाकूर यांचे संकेत
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी सज्ज, जागावाटपही पूर्ण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement