एक्स्प्लोर

Dongri Building Collapse | ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांचं निलंबन

पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी या प्रकरणी सध्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

मुंबई : मुंबईच्या डोंगरी भागात असलेल्या केसरभाई इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेच्या वतीने पहिली कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई महापालिका बी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त विवेक राही याच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी या प्रकरणी सध्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या डोंगरी भागात 100 वर्ष जुन्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर सर्व जखमींना उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. VIDEO | मुंबईकर मरतायत...कुणाला सोयरसुतक आहे? | एबीपी माझा डोंगरीतील दुर्घटनेची सर्वंकष चौकशी : मुख्यमंत्री फडणवीस म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती केली होती. विकासकाने काम वेळत केलं की नाही याची चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी केली जाईल. यादरम्यान दुर्घटना स्थळी बचाव व मदत कार्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क आणि सक्रिय केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडे सोपविण्यात आले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल. या ठिकाणी 15 कुटुंबं राहतात. त्यामुळे दुर्घटनेत अडकलेल्यांपर्यंत पोहचणे बचाव आणि मदत कार्यास गती देण्यावर भर दिला जात आहे. VIDEO | मुंबईकरांच्या मरणयातना जवळून पाहणारे 'माझा'चे प्रतिनिधी | मुंबई | एबीपी माझा संबंधित बातम्या इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  Dongri Building Collapse | डोंगरीतील कोसळलेली केसरबाई इमारत म्हाडाचीच, पालिका आयुक्तांची कबुली  मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार : मुख्यमंत्री फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget