एक्स्प्लोर

पबवर कारवाई केली म्हणून निलंबन, पोलीस निरीक्षकाचे परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप

परमबीर सिंह यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे निलंबन रद्द करून पुन्हा  कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप ही अनुप डांगे यांनी  केला आहे.

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. परमबीर सिंह यांच्या आरोपामुळे अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार आहे. एकीकडे परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप लावला तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे मगितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे परमबीर सिहं यांची आणखी अडचण होण्याची शक्यता आहे. 

गावदेवी पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार केल्याचं पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका पबवर कारवाई केली म्हणून आयुक्तांनी आपल्या विरोधात कारवाई केल्याचा आरोप अनुप डांगे यांनी केला आहे. अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. 

गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप

त्यात केलेल्या आरोपांनुसार, गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर 22 नोव्हेंबर 2019 रोजी कारवाई केली होती. पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगून कारवाईस विरोध केला होता. त्यानंतर एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंह यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा फोन आला होता. पण तेव्हा डांगे भेटायला गेले नाही. पण त्यानंतर परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर अनुप डांगे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आणि 4 जुलै 2020 रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात त्यांची बदली झाली आणि नंतर 18 जुलै रोजी डांगे यांचं निलंबन झाल्याचं पत्रात म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह

या दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे निलंबन रद्द करून पुन्हा  कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप ही अनुप डांगे यांनी  केला आहे. तसेच परमबीर सिंह यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही पत्रात नमूद केले आहे. एकूणच एकीकडे परमबीर सिंह हे गृहमंत्र्यांवर आरोप करत असताना मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यांनी देखील परमबीर सिंहांवर गंभीर आरोप केले आहेत. या दोन पत्रांमुळे मुंबई पोलीस दल ढवळून निघाले आहे हे नक्कीच. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागला असं हे चित्र आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

Embed widget