एक्स्प्लोर

पुन्हा CBI विरुद्ध राज्य सरकार? अनिल देशमुख प्रकरणात CBIचं मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स 

Anil Deshmukh Case : सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या (sushant singh rajput) तपासावरुन सीबीआय (CBI) विरुद्ध राज्य सरकार वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सीबीआय आणि ठाकरे सरकार वाद रंगण्याची शक्यता आहे.

Anil Deshmukh Case : सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या  (sushant singh rajput)  तपासावरुन सीबीआय (CBI) विरुद्ध राज्य सरकार (Maharashtra GOVT) वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सीबीआय आणि ठाकरे सरकार वाद रंगण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावलं आहे. मात्र या दोघांनीही सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय. सीबीआयने कार्यालयात येऊन माहिती घ्यावी असा पवित्रा या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Anil Deshmukh Case : पुन्हा CBI विरुद्ध राज्य सरकार? मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत कुठे असा प्रश्न विचारण्यात येतोय. गेल्या तीन महिन्यांपासून देशमुख त्यांच्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे काटोलमध्ये फिरकलेलेही नाहीत. तर तिकडे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अटक होण्याच्या भीतीनं देश सोडून परदेशात पोबारा केला असावा, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांना संशय आहे की परमबीर युरोपातल्या एखाद्या देशात लपले असावेत. पण त्याबाबतचा पुरावा अजूनही या तपास यंत्रणांना मिळालेला नाही.

Antilia case: अटकेच्या भीतीनं परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा तपास यंत्रणांना संशय!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं  परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे, मात्र त्यांना अद्यापपर्यंत ते डिलिव्हर झालेलं नाही.  एनआयए आणि  महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत.  

परमबीर सिंह नेमके आहेत कुठे? चांदिवाल आयोगाकडून 6 ऑक्टोबरच्या सुनावणी हजर राहण्याची शेवटची संधी

परमबीर सिंह यांच्याविरोधात तीन ठिकाणी वॉरंट बजावण्यात आलं आहे. मात्र ते या तिनही ठिकाणी उपलब्ध नव्हते अशी माहिती पोलिसांनी 22 सप्टेंबर रोजी चांदिवाल आयोगापुढे सादर केली. त्यामुळे आता परमबीर नेमके आहेत कुठे?, असा सवाल विचारला जातोय.

देशमुखांनाही दिलासा नाही, सोमवारी सुनावणी

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तातडीचा कोणताही दिलासा न देता हायकोर्टानं (Bombay High Court)त्यांची याचिका सुनावणीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती. 29 सप्टेंबर रोजी देखील ही सुनावणी पुन्हा तहकूब केली असून आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी एकलपीठानं ही याचिका ऐकण्यास नकार दिल्यानंतर गुरूवारी यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र याप्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे ईडीची बाजू मांडणार असल्यानं ही सुनावणी ऑनलाईन घेण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. याला विरोध करत अनिल देशमुखांनी ताताडीच्या दिलाश्याची मागणी कोर्टाकडे केली. मात्र याचिका ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं सुनावणी 29 सप्टेंबर रोजी ऑनलाईन सुनावणीसाठी तहकूब केली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget