Covid Hospital | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'अचानक भेटीगाठी' समिती
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'अचानक भेटीगाठी' समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोविड रुग्णालयांना अचनाक भेट देऊन उपचारासंबंधी माहिती घेणार आहे.
मुंबई : कोरोनाग्रस्तांवरती नेमका कसा उपचार होतोय? रुग्णालयातल्या आरोग्यसुविधा व्यवस्थित आहेत का? हे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीला रुग्णालयात अचानक भेटी देवून कोरोना वार्ड, आयसीयू कक्ष आणि इतर सुविधा पाहण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्वोच्च न्यायलायच्या आदेशानंतर ही समिती गठित झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या संदर्भातला आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. ह्या समितीच्या कामकाजाबरोबरच कोरोना वार्ड, रुग्णालयात सीसीटिव्ही बसवण्यात येणार आहेत.
जिल्हा पातळीवरच्या समितीमध्ये आठ जण सदस्य असतील. जिल्हाधिकारी अध्यक्ष, सिव्हिल सर्जन सचिव त्या शिवाय मेडिकल कॉलेज असेल तर मेडिकल कॉलेजचे डिन हे सदस्य असणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी मुनिसिपल कमिशनरच्या अध्यक्षतेखाली 14 जणांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कोरोना बाधितावर होणारे उपचार, रुग्णालयातील आरोग्य सुविधा यावरती ही समिती देखरेख ठेवेल. जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत रुग्णालयाच्या भेटीदरम्यान समितीला सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध करुन द्यावे तसेच रुग्णालयात मदत कक्ष तयार करुन रुग्णांच्या नातेवाइकांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे आप्तांची विचारपूस करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची काळजी व्यवस्थित घेतली जावी, त्यांना मिळणारे उपचार रुग्णालयांमधील सुविधा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यात मुंबई वगळता अन्यत्र सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
Jalneti | 'जलनेती' वापरुन कोरोना प्रादुर्भाव टाळता येतो; पुण्यातील डॉक्टरांचा दावा
रुग्णालयांना अचानक भेटी देण्याचे आदेश या समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव असतील. त्या-त्या जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी किंवा ह्रदय विकार तज्ज्ञ किंवा त्या-त्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार हे या समितीचे सदस्य असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील सामान्य औषध विभागाचे प्रमुख इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष यांचाही समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या समितीला कोरोना रुग्णालायांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी करणं भेटीदरम्यान समिती सदस्यांना विलगीकरण कक्ष पक्षांना भेटी देऊन रुग्णांना देण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेऊन कागदपत्रांची पाहणी करावी अचानक भेटी द्याव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मुंबई लगतच्या शहरांना भेट, कोरोनाचा आढावा, चाचण्या वाढवण्याची मागणी