कोण म्हटलं पालिकेच्या रुग्णालयात व्यवस्थित उपचार होत नाही? 'नायर'चं उदाहरण वाचा
महापालिकेच्या रुग्णालयात व्यवस्थित उपचार होत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, नायर रुग्णालयाने हा समज चुकीचा ठरवला आहे. एका ज्येष्ठ नागरिकावर नायर रुग्णालयात यशस्वी उपचार झाल्यानंतर त्यांनी खूश होत 50 हजार रुपयांची देणगी रुग्णालयाला दिली आहे.
मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत हे समज मुंबईतील नायर रुग्णालयाने खोडून काढला आहे. 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक ज्यांना निमोनिया आणि मधुमेहचा त्रास होता. ते कोविड पोसिटिव्ह आले. उपचारासाठी त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेत. नायर रुग्णालयाने केलेले उपचार आणि सेवेने खुश होऊन या गृहस्थाने 50 हजार रुपये स्वखुशीने देणगी म्हणून दिली आहे.
दिलीप कदम, असे 65 वर्षीय आजोबांचे नाव आहे. मुंबईमध्ये त्याचं साडीचं दुकान असून घरी पत्नी, 2 मुलं, सून, नातू असं कुटुंबं आहे. आजोबांना मधुमेहाचा त्रास आहे आणि त्यातच त्यांना निमोनियाची झाला. उपचारासाठी दिलीप कदम यांना सर्वप्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, दिलीप कदम यांनी तपासणी करण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी दीड लाख रुपये डिपॉझिट, सहा हजार रुपये एका दिवसाचं बेडच भाडं आणि उपचार होईल त्याचा खर्च वेगळा असा रेट कार्ड त्यांच्या मुलाला आधीच दिला. महापालिकेच्या रुग्णालयात नीट लक्षय दिले जात नाही हा गैरसमज दिलीप कदम यांच्या कुटुंबियांच्या मनात होता. ज्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयाची वाट सर्वप्रथम धरली.
कामाठीपुरा 'रेड लाईट एरिया' झाला कोरोनामुक्त एक रुपयाही न घेता उपचार सुरुवातीचे पैसे भरु मात्र नंतर जर बिल वाढले तर कसं करायचं हा प्रश्न कुटुंबातील सदस्यांसमोर उभा राहिला. खासगी रुग्णालयाकडील पावलं नायरच्या दिशेने वळू लागली. 3 जूनला दिलीप कदम यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिलीप कदम हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे केस पेपरचे 10 रुपये सुद्धा घेतले गेले नाही. दिलीप कदम यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. कुटुंबातील लोकांना महापालिकेच्या तारदेव येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यांत आलं. कोरोना पोझिटिव्ह असल्यामुळे फक्त फोनद्वारेच दिलीप कदम आणि त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क होत होता. मात्र दिलीप कदम यांना कुटुंबाची कमतरता नायर रुग्णालयाच्या डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी कधीच भासू दिली नाही. 15 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर दिलीप कदम यांनी कोरोनावर मात केली आणि घरी परतले. सोबत घेऊन आले ते रुग्णालयातील मिळालेले नवीन कुटुंबाच्या आठवणी.
सामाजिक बांधिलकी जपत 50 हजार रुपयांची देणगी खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचं बिल आकरण्यात आलं असतं. मात्र, नायरमध्ये 15 दिवस उपचार घेऊन सुद्धा 1 रुपयाही बिल घेण्यात आलं नाही. नायर रुग्णालय गोर गरिबांना अशीच मदत करत राहो म्हणून सामाजिक बांधिलकी जपत 50 हजार रुपयांची देणगी दिलीप कदम यांच्या कुटुंबियांनी दिली. ज्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये कदम कुटुंबियाना ठेवण्यात आलं होतं. तिथे सुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचे नितीन कदम यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात योग्य आणि काळजीपूर्वक उपचार होतात आणि या पुढे आम्ही पालिकेच्या रुग्णालयातच काही आजर असल्यास उपचार घेण्याचं नितीन कदम यांनी सांगितलं. नायरचे डीन डॉक्टर मोहन जोशी यांनी समाधान व्यक्त करत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असण्याची भावना व्यक्त केली. तसेच डॉक्टर आणि आरोग्य सेवक फार उत्तमरित्या काम करत असतात. आमच्या येथे आलेले 90 ते 95 टक्के रुग्ण बरे होऊन घरी जातात. फक्त इतकीच अपेक्षा आहे की कुठल्याही गोष्टीला नावं ठेवू नका आणि जर काही उणीव असेल तर त्याचा बाऊ करू नका, अशी अपेक्षा मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
Unlock 1.0 | नॉन एसी हॉल, खुल्या लॉनमध्ये लग्नकार्यास सरकारची सशर्त परवानगी