एक्स्प्लोर
EVM | ईव्हीएमविरोधात 21 ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा
"ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा," असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, विद्या चव्हाण उपस्थित होते.
मुंबई : ईव्हीएमविरोधात येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ईव्हीएमविरुद्ध राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटले असून विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. तसंच बॅलेट पेपरसंदर्भात महाराष्ट्रातील घरोघरी अर्जांचं वाटप करुन त्यांचं मत जाणून घेणार आहोत, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
"ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा," असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत, विद्या चव्हाण उपस्थित होते.
"बॅलेट पेपरसंदर्भात आम्ही महाराष्ट्रातील घराघरात जाऊन फॉर्म भरुन घेणार आहोत. मग 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघेल. त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे फॉर्म देणार आहोत," असं राज ठाकरे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापुढे आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतर नेते काय म्हणाले?
अजित पवार
निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. जनतेला आव्हान करत आहोत त्यांनीही प्रतिसाद द्यावा. निवडणुका पारदर्शकपणे घेतल्या पाहिजे, मतदारांनाही कळलं पाहिजे, त्यांनी कोणाला मतदान केलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
छगन भुजबळ
ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. तसंच अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले मग आपण का वापरायचे? असा सवालही त्यांनी विचारला.
बाळासाहेब थोरात
आमचं आंदोलन लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे, असं म्हणत ईव्हीएमबाबत समज-गैरसमज दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आणि सरकारची असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.
राजू शेट्टी
पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे, 21 तारखेचा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केलं. तर 15 ऑगस्ट रोजी गावसभेत ईव्हीएमविरोधात ठराव मंजूर करुन मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना केलं.
बी जी कोळसे पाटील
191 पैकी फक्त 18 देशांमध्ये ईव्हीएम वापरलं जातं आणि ते छोटे देश आहेत. मोठी लोकशाही असलेल्या देशात ईव्हीएम नाहीत किंवा त्यांनी ईव्हीएम वापरणं बंद केलं आहे. त्यामुळे आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement