एक्स्प्लोर
11 लाख मतदारांची नावं कुठे, स्थायीचे महापालिकेला चौकशीचे आदेश
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मतदारयादीतील 11 लाख जणांची नावं गहाळ झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीतही उमटले आहेत. स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ कसा झाला, तसंच 11 लाख मतदारांची नावं कुठे गेली, याची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीनं मुंबई महापालिका प्रशासानाला दिले आहेत. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यासंबंधी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
मतदार यादीतून मराठी नावंच वगळली गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचंच असतं, असा दावा भाजपने केला आहे. मतदार यादीतील घोळ प्रकरणावर भाजपच्या दिलीप पटेल यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा घेतला होता.
काय आहे प्रकरण?
2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतदार यादीत नाव असलेल्यांपैकी तब्बल 11 लाख जणांची नावं यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावं लागलं.
विशेषतः मालाड, घाटकोपर, वरळी, बोरीवली या ठिकाणच्या मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी विधानसभा निवडणुकीला मतदान केलं होतं, पण यावेळी नावं मतदार यादीतून वगळण्यात आली.
विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्या नियमित केल्यानंतर 11 लाख मतदारांचं नाव वगळण्यात आलं. यामध्ये काही जण मृत असल्याचं किंवा काही मुंबईत राहत नसल्याचं कारण सांगितलं गेलं.
शिवसेना याप्रकरणी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. यासाठी शिवसेना भवनात टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली. यावर मतदार तक्रार नोंदवू शकतात. तसंच याप्रकरणी शिवसेनेच्या शाखांमध्येही तक्रार नोंदवता येणार आहे. या सर्व तक्रारी शिवसेना कोर्टात सादर करणार असल्याचं समजतं.
संबंधित बातम्या:
मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ, 11 लाख मतदारांची नावं गायब
मतदार यादीतील घोळाप्रकरणी शिवसेना कोर्टाचे दरवाजे ठोठावणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement