(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Strike : 'या' अफवांमुळे ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन दीर्घकाळ सुरु राहिलं!
काही अफवांमुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास साडेपाच महिने सुरु राहिला.
मुंबई : एसटी तोट्यात असल्याचे कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी 28 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यव्यापी संप पुकारला होता. संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने 7 एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष केला. कोर्टाच्या निर्णयानंतर हा संप मिटला असंच वातावरण सगळीकडे होतं. शुक्रवारी (8 एप्रिल) कर्मचारी परतीच्या वाटेवर असताना कर्मचाऱ्यांचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचला. दगडफेक तसंच चप्पल फेकत आणि घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
दरम्यान पसरलेल्या काही अफवांमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास साडेपाच महिने सुरु राहिला. त्यातील काही अफवा या पुढीप्रमाणे होत्या.
याच काही अफवांमुळे आंदोलन दीर्घकाळ सुरु राहिलं
- आंदोलनात राहतील संपात सहभागी होतील त्यांचंच विलिनीकरण होणार बाकी वंचित राहतील.
- कोर्टात प्रतिज्ञापत्र ज्यांचं आहे, ज्यांनी 300 किंवा 500 रुपये दिले आहेत अशा लोकांच्याच कारवाया मागे होतील, मैदानात येतील त्यांच्याच कारवाया मागे घेतल्या जातील. त्यामुळे जेव्हा जेव्हा सुनावणी असायची तेव्हा तेव्हा मैदानात गर्दी वाढायची.
- जे संपात आहे त्यांच्यावरच कारवाई होणार, जे दुखवट्यात आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही.
- तीन महिन्यात त्रिसदस्यीय समितीनं अहवाल दिला की आपलं विलिनीकरण झालं.
- सोबतच त्रिसदस्यीय अहवाल काहीही असो, ॲड. गुणरत्न सदावर्ते निगेटिव्ह अहवालाल पॉझिटिव्ह करु शकतात.
- एसटी महामंडळाकडून वेळोवेळी कारवाया मागे घेतल्या पण सोशल माध्यमातून महामंडळ कशी फसवणूक करेल आणि आपण रुजू झाल्यावर आपल्यावर कशी कारवाई करेल ही सुद्धा अफवा समोर आली.
- सरकारने दिलेले पैसे आपण रुजू झाल्यावर ते पुन्हा परत घेतील.
- काही कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय पत्रातच फेरफार करण्यात आले आणि त्यात बदल केल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
- 45 दिवसांच्यावर जेव्हा एखादा संप जातो तेव्हा तो संप अधिकृत होतो आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो.
- निकाल लागलेला नाही अजून, सातवा वेतन आयोग मिळणार, सदावर्ते निकाल वाचून सांगणार की आपल्याला सातवा वेतन आयोगासोबतच आणखी काय काय मिळालं
संबंधित बातम्या