एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींची 462 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
वांद्रे रेक्लमेशनजवळ असलेल्या जमात ए जमुरिया झोपडपट्टी परिसरात आलिशान फ्लॅट बांधून बाबा सिद्दीकींनी घोटाळा केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.
मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना एसआरए घोटाळ्यात ईडीने दणका दिला आहे. सिद्दीकींची मुंबईतील तब्बल 462 कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. वांद्रे पश्चिममध्ये बाबा सिद्दीकी यांच्या 'पिरॅमिड डेव्हलपर्स' या कंपनीच्या नावे 33 फ्लॅट्स होते.
वांद्र्यातील एसआरए योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांचा तपास करताना पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. चारशे कोटींच्या एसआरए योजनेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकींवर आहे.
वांद्रे रेक्लमेशनजवळ असलेल्या जमात ए जमुरिया झोपडपट्टी परिसरात आलिशान फ्लॅट बांधून हा घोटाळा केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.
बनावट कागदपत्रं तयार करुन जास्तीचे फ्लॅट लाटले, सिद्दीकी आणि बिल्डरने फसवणूक करण्यास लोकांना मदत केली आणि एक आलिशान इमारत बांधून, ती विकून मोठा नफा कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करुन अतिरिक्त एफएसआय लाटल्याचा दावा केला जात आहे. सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
स्थानिक कोर्टाने 2014 मध्ये वांद्रे पोलिसांना बाबा सिद्दीकीसोबत 158 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. ईडीने तपास सुरु करुन ही कारवाई केली. घोटाळ्याच्या माध्यमातून पैसे चुकीच्या मार्गाने परदेशी पाठवल्याची शंका तपास यंत्रणांना आहे.
बाबा सिद्दीकी कोण आहे?
काँग्रेसतर्फे वांद्रे पश्चिममधून तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या कालावधीत अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्री होते. 2000 ते 2004 या कालावधीत ते म्हाडा रिपेयर बोर्ड आणि स्लम बोर्डाचे अध्यक्ष होते. 2014 मध्ये भाजपच्या आशिष शेलार यांच्याकडून सिद्दीकींना पराभव स्वीकारावा लागला होता. सिद्दीकी हे सलमान खानचे निकटवर्तीय मानले जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement