(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ते' पत्र रेल्वेच्या अंतर्गत पत्रव्यवहाराचा भाग, 'एबीपी माझा'च्या बातमीविषयी रेल्वेचं स्पष्टीकरण
राज्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांसाठी 'जनसाधारण विशेष' रेल्वे चालवणार असल्याच्या एबीपी माझाच्या वृत्ताविषयी रेल्वेने स्पष्टीकरण जारी केलंय. एबीपी माझाने ज्या पत्रावरून ही बातमी प्रसारित केली ते पत्र रेल्वेच्या अंतर्गत पत्रव्यवहाराचा भाग होतं, ते रेल्वेचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक नव्हतं, असं दक्षिण-मध्य रेल्वेने स्पष्ट केलंय.
मुंबई : राज्यात विविध भागात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांसाठी रेल्वे 'जनसाधारण विशेष' रेल्वे चालवणार असल्याच्या एबीपी माझाच्या वृत्ताविषयी रेल्वेने स्पष्टीकरण जारी केलंय. एबीपी माझाने ज्या पत्रावरून ही बातमी प्रसारित केली ते पत्र रेल्वेच्या अंतर्गत पत्रव्यवहाराचा भाग होतं, ते रेल्वेचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक नव्हतं. मात्र हे अंतर्गत पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं, असं दक्षिण-मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे. यामध्ये रेल्वे ने ते पत्र चुकीचं किंवा खोटं असं आहे असं म्हटलेलं नाही.
रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकातच,रेल्वेकडून अशी कुठलीही जनसाधारण विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, अशा माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे. या विशेष ट्रेनने परराज्यातील मजूर, कामगारांना त्यांच्या राज्यात सोडलं जाणार अशी चर्चा होती. यामुळे रेल्वे स्टेशन्सवर गर्दी जमा होईल आणि कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत होईल, असं दक्षिण-मध्य रेल्वेने स्पष्ट केलं.
जनसाधारण विशेष ट्रेनबाबतचं रेल्वेचं पत्र मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दीBandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी