एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BMC साठी काँग्रेसच्या पहिल्या यादीला हायकमांडची स्थगिती

मुंबई : मुंबई काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वाद आणि गटबाजीमुळे, महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीला स्थगिती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, या यादीत संजय निरुपम यांच्या गटातील उमेदवारांचाच वरचष्मा असल्याची आणि इतर उमेदवारांना डावलण्यात आल्याची टीका झाली. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसमधले अंतर्गत वाद आणि संजय निरुपम यांना होणारा विरोध लक्षात घेता पहिल्या यादीला स्थगिती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. लवकरच, पहिल्या यादीतील आक्षेप असलेल्या जागांवर उमेदवारांच्या फेरबदलीचा विचार केला जाईल. त्यामुळे काँग्रेसच्या पहिल्या यादीत जागा पटकावलेल्या अनेकांची उमेदवारी रद्द होऊ शकते तसंच, अनेकांना नव्याने या यादीत स्थान मिळू शकतं. गटबाजी रोखण्यासाठी भुपेंद्रसिंह हुड्डांची मध्यस्थी मुंबई काँग्रेसमधले वाद आणि निरुपम विरुद्ध कामत गटबाजी रोखण्यासाठी खास दिल्लीहून भुपेंद्रसिंह हुड्डा मध्यस्थी करण्यासाठी रात्री मुंबईत दाखल झाले. मात्र, हुड्डा थांबलेल्या हॉटेल ललितला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: घेराव घातला. हुड्डा यांच्यासोबत वादावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रिया दत्त, नसिम खान, चरणसिंग सप्रा, संजय निरुपम हे देखिल हॉटेल ललित इथे दाखल झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आक्षेप काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. उमेदवारांना तिकीटं विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसच्या अंतर्गत गोटात केला जात आहे. केवळ निरुपम समर्थक नसल्याने अनेक विद्यमान आणि अनुभवी नगरसेवकांनाही डावलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. केवळ तीन महिलांनाच तिकीट काँग्रेसच्या पहिल्या यादीत मुंबई महिला काँग्रेसमधील केवळ तीन महिलांनाच तिकीटे देण्यात आली होती. मर्जीतल्या व्यक्तींच्या पत्नी, बहिण अशा नातेवाईक महिलांना कोणत्याही सबळ आधाराशिवाय तिकीट वाटप केल्याचा आरोप मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केला होता. या यादीत बदल व्हावेत यासाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. अखेर अंतर्गत वाद आणि निरुपम यांना होणारा विरोध लक्षात घेता पहिल्या यादीला स्थगिती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget