एक्स्प्लोर
शिवसेना मंत्र्यांच्या खांदेपालटाची चर्चा, अनेक मंत्र्यांना डच्चू?
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना मंत्र्यांची खांदेपालट करण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे त्याबाबत गांभिर्याने विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे खांदेपालटात ज्येष्ठ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे.
याबाबतद अंतिम निर्णय झाला नसला तरी गुरुवारी मंत्री - आमदारांची आमने सामने बैठक होणार आहे, ही बैठक वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.
विधानपरिषदेतील मंत्र्यांवर टांगती तलवार
आरोग्य मंत्री दीपक सावंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पक्षसंघटना बांधणीच्या जबाबदारीसाठी मंत्रिमंडळातून पद मुक्त केली जाण्याची शक्यता आहे.
गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना आमदारांची नाराजी भोवण्याची चिन्हं आहेत, तर आक्रमक असलेल्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
येत्या काळात शिवसेनेच्या अजेंड्यावर 'मिशन विदर्भ' असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्यमंत्री संजय राठोड यांना बढती मिळू शकते.
तर ग्रामीण भागातील चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असेल.
यामध्ये कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, रत्नागिरीचे उदय सामंत, यवतमाळचे तानाजी सावंत, निफाडचे अनिल कदम, पारनेर(अहमदनगर)- विजय औटी आणि पाटणचे शंभूराजे देसाई यांची नावं आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या
शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement