एक्स्प्लोर
आईच्या हातातून सहा महिन्यांचं बाळ सटकलं, चिमुकल्याचा मृत्यू
कल्याणच्या पश्चिम भागातील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
कल्याण : हाय हिल्सच्या सँडलमुळे आईच्या हातून पडून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. कल्याणमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. कल्याणच्या पश्चिम भागातील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
या कार्यालयात एका लग्नासाठी उल्हासनगरला राहणाऱ्या फैमिदा हमीद शेख या आपल्या मोहम्मद हमीद शेख या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन आल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर घरी परतण्यासाठी येत होत्या.
मात्र अचानक हाय हिल्सच्या सँडलमुळे त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातून चिमुकला मोहम्मद थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. हा आघात त्याला सहन झाला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकाराबाबत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement