एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बालसंगोपनासाठीही आता सहा महिन्यांची पगारी रजा
प्रसुती रजेननंतर आता मुलांच्या संगोपनासाठीही महिलांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. तसंच बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे.
![बालसंगोपनासाठीही आता सहा महिन्यांची पगारी रजा six month leave for child care to state govt employees latest updates बालसंगोपनासाठीही आता सहा महिन्यांची पगारी रजा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/18174031/sudhir-mungantiwar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रसुती रजेननंतर आता मुलांच्या संगोपनासाठीही महिलांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. तसंच बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे.
18 वर्षांच्या आतील मुलं असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. या निर्णयामुळे दहावी किंवा बारावीच्या परीक्षा काळात मुलांसाठी 180 दिवसांनी रजा महिला आणि पुरुष कर्मचारी घेऊ शकतील.
बालसंगोपनासाठी असलेली 180 दिवसांची रजा ही विभागूनही घेता येईल. एका वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा ही रजा घेता येईल.
राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून, पुढील काही दिवसात शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion