एक्स्प्लोर

BMC Covid Scam: BMC कथित कोविड घोटाळा प्रकरण: SIT पथक अॅक्शन मोडमध्ये, कॅग अहवालानंतर महापालिका मुख्यालयात चौकशी

BMC Covid Scam : मुंबई महापालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटी पथकाने कॅगच्या अहवालानंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन चौकशी केली आहे.

BMC Covid Scam : मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणात (Covid Scam) एसआयटी (SIT) स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे.  जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची माहिती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एसआयटी पथकाने सुधार विभागातील सहआयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारा संदर्भात चौकशी केली. कोरोना (Corona) काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कारभारा संदर्भात कॅगचा (CAG) अहवाल अर्थसंकल्पी अधिवेशनात सादर करण्यात आला होता. या कॅग अहवालात मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कारभारामध्ये अनियमितता आढळल्याचा समोर आलं होतं. 

हा अहवाल समोर आल्यानंतर भाजपकडून या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी जोर धरु लागली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य केली. जून महिन्यात या सगळ्या कारभाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानंतर मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता (नियोजन) सुनील राठोड यांच्या दालनात हे एसआयटीचे पथक दाखल झाले होते. त्या ठिकाणीसुद्धा  या पथकाने या विभागातील कारभारासंदर्भात चौकशी केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी आर्थिक गुन्हे शाखेने कॅगच्या अहवालासंदर्भात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले होते. या अधिकाऱ्यांकडून आर्थिक गुन्हे शाखेने अधिकची माहिती मिळवली असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या चौकशीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला होता. त्याचप्रामाणे हा एसआयटी चौकशीचा भाग असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. तसेच विविध विभागांची ही चौकशी सुरु राहणार असून कॅगच्या अहवालानुसार ही चौकशी केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. 

काय आहेत ईडीचे आरोप? 

बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे.  कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असं ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. . बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीनं केला आहे. 

एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी देखील अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget