एक्स्प्लोर

Siddhivinayak Temple : सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घालून आला तरच प्रवेश

Siddhivinayak Temple Dress Code : तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे भाविकांनी पूर्ण अंगभर असलेले कपडे परिधान करून यावे असं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

मुंबई : गणेशभक्तांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. ड्रेसकोड संदर्भातलं सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सिद्धीविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली. 

अनेक भाविकांकडून या आधी तक्रारी

सिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने होत होती. त्यामुळेच सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडलं होतं. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Siddhivinayak Temple Dress Code : तोकड्या कपड्यातील भाविकांना प्रवेश नाही

सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी. म्हणजेच समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल अशा कपड्यांवर आणि तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे असं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

शॉर्ट्स परिधान करणाऱ्यांना प्रवेश बंदी

माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धीविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Narayan Rane on Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 17 March 2025Sanjay Raut PC | औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारची सुरक्षा, मग नाटकं कशाकरता, राऊतांची भाजपवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aurangzeb Tomb Row: शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच्या लोकांना कबर का हटवायचेय? खुलताबादच्या फुलविक्रेत्याचा प्रश्न
शिवरायांच्या वंशजांनी औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावला नाही, मग आताच कबर का हटवायचेय? फुलविक्रेत्याचा प्रश्न
Ajit Pawar : त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
त्यांना सोडणार नाही, त्यांची नावं काढा; जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम!
Narayan Rane on Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रहार
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Video : बलूच बंडखोर थांबता थांबेनात; रेल्वे हायजॅकनंतर आता पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ल्याचा सुद्धा बाॅलिवूड स्टाईलने व्हिडिओ रिलीज
Ajit Pawar on Ladki Bahin : लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार, मात्र योजना बंद करणार नाही : अजित पवार
लाडकी बहीण योजनेतून नावं कमी झाली, त्यांना दिलेल्या पैशांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले...
IPL 2025 : आयपीएल मोफत पाहण्याची संधी, 'या' कंपनीनं आणली शानदार ऑफर, फक्त एक काम करावं लागणार
IPL 2025 मोफत पाहण्याची संधी, फक्त एक काम करावं लागेल, 'या' कंपनीची भन्नाट ऑफर
Amol Mitkari : औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे; अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर
औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण करणाऱ्यांनी आधी सोलापूरकर आणि कोरटकरबद्दल बोलावे; अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर
Nitin Pawar : काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा जीव देण्याचा प्रयत्न, गंभीर आरोपांच्या कचाट्यात अडकलेले राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार म्हणाले...
काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा जीव देण्याचा प्रयत्न, गंभीर आरोपांच्या कचाट्यात अडकलेले राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार म्हणाले...
Embed widget