एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्रॉफर्ड मार्केटमधील पाळीव प्राण्यांचा बाजार बंद करा: हायकोर्ट
मुंबई: दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
हे आदेश देताना हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे की, ही दुकानं पुन्हा सुरू होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशननं काळजी घ्यावी. जर ही कारवाई जमणार नसेल तर हायकोर्ट तुमच्यावर कारवाई करेल असा सज्जड दम हायकोर्टाने दिला आहे.
पशु पक्षांसाठी कार्यरत एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना पशू पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्त्यांच्या मते इथं ठेवण्यात आलेल्या पशू पक्षांवर अनन्वित अत्याचार केले जातात. त्यांना अतिशय बंदीस्त जागेत छोट्या छोट्या पिंजऱ्यात बंद करून ठेवलं जात. कुत्र्यांची आणि मांजरांची पिल्लं डोळे उघडायच्या आतच त्यांच्या आईपासून हिरावून इथं विक्रीसाठी आणून ठेवली जातात. अनेकदा या प्राण्यांना गुंगीची औषधं देऊन झोपवलं जातं. यासर्व बाबी लक्षात घेऊन हायकोर्टानं पाळीव पशुपक्षांचा हा बाजार कायमचा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हायकोर्टानं हे आदेश केवळ क्रॉफर्ड बाजारपुरताच दिले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी अशी दुकानं असल्यानं त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
निवडणूक
Advertisement