एक्स्प्लोर
Advertisement
विश्वनाथ महाडेश्वर महापौर, हेमांगी वरळीकर उपमहापौर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर विराजमान झाले आहे.
महापौर- उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानात महाडेश्वर यांना शिवसेना-भाजपची मिळून एकूण 171 मतं मिळाली, तर हेमांगी वरळीकर यांना 165 मतं मिळाली, 5 मतं अवैध ठरली.
या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने, महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारांना बक्कळ मतं मिळाली.
महापौरपदासाठी काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी अर्ज भरला होता. त्यांना काँग्रेसच्या संख्येएवढीच म्हणजे अवघी 31 मतं मिळाली. तर उपमहापौरपदासाठी विन्नी डिसुझा यांनी अर्ज भरला होता. त्यांनाही 31 मतंच मिळाली.
भाजपची शिवसेनेला साथ
मुंबई महापालिकेत 84 जागा मिळालेल्या शिवसेनेला चार अपक्षांची साथ मिळाल्याने त्यांचं संख्याबळ 88 वर पोहोचलं होतं. महत्त्वाचं म्हणजे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या 83 नगरसेवकांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाडेश्वर यांना एकूण 171 मतं मिळाली.
मनसेची दांडी
समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. परंतु त्यांनी तटस्थ राहून कोणालाही मतदान केलं नाही. तर पक्षाकडून निरोप न आल्याने मनसेचे सात नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेला जाणं टाळलं.
दुसरीकडे मुंबईच्या उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे.
भाजपकडून महापौरांना कमळाचा हार
दरम्यान भाजपचे गटनेते मनोद कोटक यांनी नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना कमळाच्या फुलांचा हार घालून अभिनंदन केलं.
दुसरीकडे या निवडणुकीसोबतच सभागृह नेत्याचीही निवड होणार आहे. सत्ताधारी पक्ष म्हणजेच शिवसेनेचाच सभागृह नेता होणार हे जवळपास निश्चित आहे.
कोण आहेत विश्वनाथ महाडेश्वर?
विश्वनाथ महाडेश्वर हे राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. वॉर्ड क्रमांक 87 मधून भाजपचे महेश पारकर आणि काँग्रेसचे धर्मेश व्यास यांचा पराभव करून यंदा ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
पश्चिम उपनगरातील सक्षम पर्याय म्हणून वाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
विश्वनाथ महाडेश्वर यांनी पहिल्या टर्ममध्ये शिक्षण समितीचे चेअरमन, नंतर पाच वर्ष स्थायी समितीमध्ये त्यांनी काम पाहिलं आहे.
2012 मध्ये पत्नी पूजा महाडेश्वर निवडून आल्या होत्या.
LIVE UPDATE-------------------
- शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वरांना मतदान करण्याची प्रक्रिया पूर्ण, काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना मतदानाची प्रक्रिया सुरु
- समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी सभागृहात उपस्थित, मात्र तटस्थ राहून कोणालाही मतदान करणार नाही, तर मनसेचे सात नगरसेवक सभागृहात अनुपस्थित
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3.30 ते 4 वाजेपर्यंत मुंबई महापालिकेत पोहोचणार, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 'मातोश्री'हून निघणार
- मुंबई : शिवसेनेचे 88 नगरसेवक + भाजपचे 83 नगरसेवक, एकूण 171 नगरसेवकांचा विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबा
- भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार मुमताझ खान यांनी सेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही
- पहिल्या दिवसापासून सांगत होतो, एका घरातले दोन भाऊ कितीही भांडले तरी घरातील कार्याला दोघे भाऊ एकत्र येतात- चंद्रकांत पाटील
- मुंबई : निवडणूक प्रक्रिया सुरु, भाजप नगरसेवकांचा शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा; सपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीत
- महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक गैरहजर, पक्षाकडून निरोप न आल्याने नगरसेवक कार्यालयातच
- पक्षाकडून निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही याबाबत कोणताच निरोप न आल्यानं मनसेचे नगरसेवक सभागृहात आले नाहीत
- समाजवादी पक्षाचे सर्व सहाही नगरसेवक सभागृहात हजर
- शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाच सभागृह नेतेपदी नेमले जाईल हे आता निश्चित झाले आहे.
- यासोबतच, स्थायी, सुधार, शिक्षण, आरोग्य या समित्यांच्या सदस्यांची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
- दरम्यान, मुंबईचं महापौरपद शिवसेनेलाच मिळाल्याने, शिवसेना जंगी सेलिब्रेशन करणार आहे. ही संधी हेरुन शिवसेनेनं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली. वरळी सी-लिंकवरुन उद्धव ठाकरे यांची एक रॅली निघणार आहे. ही रॅली मुंबई महापालिकेत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईकरांचे आभार मानतील आणि त्यानंतर हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्त्यांना अभिवादन करणार आहेत.
- महापौरपदासाठी महाडेश्वर मैदानात
- शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदासाठी, तर हेमांगी वरळीकर या उपमहापौरपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. भाजपनं आधीच या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित आहे.
- औपचारिकता म्हणून महापौरपदासाठी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे आणि उपमहापौरपदासाठी विन्नी डिसूजा यांनीही अर्ज दाखल केले आहेत. पण, एकूण 88 जणांचा गट असल्यानं शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित आहे.
- दरम्यान, त्याचवेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पालिका घराचा वाद बाहेर आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला, तर त्यांचं महापौरपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement