एक्स्प्लोर
Advertisement
दादरमध्ये शिवसेना मनसेचं आव्हान स्वीकारण्याच्या तयारीत
मुंबई : महापालिका निवडणुका महिन्याभरावर ठेपल्या असून वातावरण तापायला हळूहळू सुरुवात होत आहे. मुंबईत मनसेला बालेकिल्ल्यातच शिवसेनेनं तगडं आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला एकमुखाने मंजुरी मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दादरमधून शिवसेनेचा पहिला बार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादरच्या वॉर्ड नंबर 191 मधून मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा आहे. त्याविरोधात शिवसेनेने कडवी लढत देण्यासाठी विशाखा राऊत यांना मैदानात उतरवण्याचं निश्चित केल्याचं म्हटलं जातं.
दादरमधल्या शिवसैनिकांनी एकमुखाने विशाखा राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राऊत यांच्या नावाचा प्रस्ताव विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.
विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर आणि माजी आमदार राहिल्या आहेत. मनसेच्या तगड्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी मातोश्रीवरुन त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement