(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाकरे गटाकडून मुंबईत मराठी दांडियाचं आयोजन, कांजूरमार्ग पूर्व येथे आयोजन
मराठी लोकांच्या आग्रहास्तव ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या वतीनं कांजूरमार्ग पूर्व येथे या मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलंय.
मुंबई : ठाकरे गटाकडून (Shivsena Uddhav Thackeray) यंदा पहिल्यांदाच मुंबईत मराठी दांडियाचं (Dandiya) आयोजन करण्यात आलंय. या मराठी दांडियाच्या कार्यक्रमाला मराठी सिनेतारकांची उपस्थिती असणार आहे. मराठी लोकांच्या आग्रहास्तव ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्यावतीनं कांजूरमार्ग पूर्व येथे या मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलंय.
आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सर्वच्या सर्व लोकसभा जागा जिकण्यासाठी मुंबईतल्या मराठी मतांवर देखील जास्त लक्ष केंद्रीत करायला भाजपने सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतले ठाकरे गटाचे नेते कामाला लागले असून, यावर्षी पहिल्यांदा मराठी दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर शिवसेनेशी जोडल्या गेलेल्या मराठी कलाकराकडे मराठी मतदार जोडण्याची विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे.
नवरात्रीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चढाओढ (Navratri 2023)
आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत . गेल्यावर्षी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मराठी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. काळाचौकी परिसरातील शहीद भगतसिंह मैदानात भव्य दांडियाचे आयोजन केले होते. यंदा ठाकरे गटाने देखील जोरदर तयाकी केली असून कांजुरमार्ग येथे दांडियाचे आयोजन केले आहे. तसेच आकर्षक बक्षिसांचे देखील वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चढाओढ पहायला मिळतेय. मंडळांना यावेळी सत्ताधाऱ्यांकडून भरगच्च देणग्या मिळाल्यात.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती आणि मराठी मतदारांना आकर्षित करण्यात येत असल्याचं एकंदरीत चित्र पहायला मिळतंय.
सिनेतारकांच्या उपस्थित दांडिया
15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान ठाकरे गटाच्या मराठी दांडियाचे आयोजन करणयात आले आहे. या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सिनेतारकांच्या उपस्थित हा दांडिया होणार आहे. तसेच पैठणी, मोबाईल, सोन्याची नथ अशी आकर्षक बक्षिसे असणार आहेत. आपला बाणा, आपला उत्सव, आपली संस्कृती जपूया, नवरात्रीच्या नवरंगात खेळू, मराठमोळा दांडिया अशी या कार्यक्रमाची ट्ॅगलाईन आहे.
हे ही वाचा :