एक्स्प्लोर
भुजबळांवरील सुनावणीदरम्यान कोर्टात शिवसेना आमदार उपस्थित
आमदार प्रकाश सुर्वे हे बराच वेळ छगन भुजबळांच्या अगदी शेजारी बसून होते.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरील सुनावणीसाठी आज भुजबळ कुटुंबातील अनेकजण हजर होते. विशेष म्हणजे, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हेसुद्धा सुनावणीवेळी उपस्थित होते. प्रकाश सुर्वे हे बराच वेळ छगन भुजबळांच्या अगदी शेजारी बसून होते.
प्रकाश सुर्वे कोण आहेत?
प्रकाश सुर्वे हे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी ते छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. भुजबळांचे कट्टर समर्थक अशीही प्रकाश सुर्वेंची ओळख होती. मात्र विधानसभेवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडूनही आले.
भुजबळांचे कुटुंबीयही उपस्थित
आजच्या सुनावणीकरता संपूर्ण भुजबळ कुटुंबिय पीएमएलए कोर्टात हजर होतं. पत्नी मीना भुजबळ, मुलगा पंकज, दोन्ही सुना विशाखा आणि शेफालीसह भुजबळांची नातवंडही कोर्टरुमध्ये उपस्थित भुजबळांच्या आजूबाजूला बसली होती.
कोर्टात काय झालं?
छगन भुजबळांच्या जामीन अर्जाला पीएमएलए कोर्टात ईडीच्यावतीनं जोरदार विरोध व्यक्त करण्यात आला. पीएमएल कायद्यातील कलम 45 च्या सुधारणेतील तरतुदीनुसार भुजबळांचा नवा जामीन अर्ज हा असंविधानिक असल्याचा आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावर यांनी केला आहे.
कायद्यात जरी सुधारणा झाली असली तरी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या मुख्य गुन्ह्याची तीव्रता कमी होत नसल्याचा दावा आहे. तसेच पीएमएलए कायद्यातील कलम 24 अंतर्गतही आरोपीला जामीन देता येणार नाही, असं त्यांनी कोर्टात सांगितलं. गुरूवारी ईडीच्यावतीने पुढील युक्तीवाद करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement