(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जे नाणारचं झालं तेच आरेचं होईल, मेट्रो कारशेडवरुन उद्धव ठाकरेंचा इशारा
मट्रो कारशेडसाठी आरेतील सुमारे 2 हजार 700 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
मुंबई : आरे जंगलातील कारशेडवरुन शिवसेना आणि भाजप आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हं आहेत. नाणारचं झालं तेच आरेचं होणार, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला.
मट्रो कारशेडसाठी आरेतील सुमारे 2 हजार 700 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरेंनीही आरेतील वृक्षतोडीला विरोध करताना नाणार प्रकल्पाची आठवण करुन दिली. लोकांच्या विरोधामुळे सरकारला नाणार प्रकल्प रद्द करावा लागला होता.
राम मंदिरासाठी सरकारनं धाडसी पाऊल उचलावंराम मंदिराचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा, अशी विनंतीही उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाला केली. राम मंदिरासंदर्भात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ठाम भूमिका होती की राम मंदिर व्हायला हवं. सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा खटला अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे न्यायालयाला विनंती आहे की आम्ही किती वेळ वाट पाहायची, लवकरात लवकर निर्णय द्यावा. शक्य असल्यास कलम 370 प्रमाणेच सरकराने राम मंदिरासाठीही एखादं धाडसी पाऊल उचलावं, असं उद्धव ठाकरेंनी सुचवलं.
दयनराजेंचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रीया दिली. उदयनराजेंकडून आम्हाला ज्या अपेक्षा आहेत, त्या आम्ही सामनामध्ये सांगितल्या आहेत. त्यांचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नाही, असंही त्यांनी सांगितलं.