एक्स्प्लोर

Sanjay Raut : अधिक उमेदवार देऊन भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : राज्यात भाजपला पैशांचे राजकारण करायचे असून राज्यात गोंधळ निर्माण करायचा असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत अधिक उमदेवार देऊन भाजपला पैशांचे राजकारण करत राज्यात गोंधळ करायचा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. 

येत्या 20 जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या 10 जागांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने बुधवारी पाच जागांची घोषणा करताना सहावी जागादेखील लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या भूमिकेवर आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडून अधिक उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या भूमिकेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली. भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. त्यांना राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करायची असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

औरंगाबाद येथे बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा राऊत यांनी समाचार घेतला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वच मुद्यांवर भाष्य केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय भूमिका स्पष्ट केली. काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या सभेवर, भाषणावर विरोधकांनी टीका करावी असे त्यात काय होते,  असा उलट सवाल राऊत यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावी असेही त्यांनी म्हटले. 

मुंडे-महाजन यांचे नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचालीची शंका

राज्याच्या राजकारणातून मुंडे-महाजन यांचे नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत का, अशी शंकाही संजय राऊत यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा आजही प्रभाव असल्याचे राऊत यांनी सांगितले.  

विधान परिषदेतील संख्याबळ काय सांगते?

विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 27 मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget