एक्स्प्लोर
Advertisement
'मोदीजी, लॉकडाऊन, नोटबंदीवर बोलता, चीन आपल्या भूमीत घुसलाय? काहीतरी बोला' : संजय राऊत
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सीमेवरील स्थितीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सत्य सांगावं असं आवाहन केलं आहे.
मुंबई : एका झटक्यात वीस जवानांना मारलं जातं. त्यांची शहादत होते. याबाबत पंतप्रधानांनी देशाला सांगितलं पाहिजे. यात काहीतरी लपवलं जात आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. माझ्या मनातली शंका नागरिक म्हणून देशातल्या मनातली शंका असू शकते, त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोललं पाहिजे. जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत असेल, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लॉकडाऊन, नोटबंदी अशा अनेक विषयांवर तुम्ही येऊन बोलता. चीन आमच्या जमिनीवर घुसलाय का? हा प्रश्न राहुल गांधी वारंवार विचारताय त्याच्यावर उत्तर देणे गरजेचे आहे.
चीनचे किती जवान मारले हे जे आकडे येतयेत ते आकड्यावर आपण बोललं पाहिजे. संघर्षाच्या काळात आपण देशाचे नेते आहेत. दिल्लीत सरकार मजबूत आहे. आपण जो निर्णय घ्याल या जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यासाठी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी असेल. राजकीय मतभेद विसरून देश तुमच्या पाठीशी उभा राहील. पण चीनला धडा शिकवण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अमित शाह यांची आहे, असं राऊत म्हणाले. ते महाबली, धाडसी आहेत, ते बाहुबली आहेत, शूरवीर आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असं देखील ते म्हणाले.
संजय राऊत यांनीही यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, 'चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीननं भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचं आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात. तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद,'.
चीन के मुंहजोरी को कब मिलेगा करारा जबाब?बिना गोली चले हमारे 20 जवान शहीद होते है.हमने क्या किया? चिनके कितने जवान मारे गये? चीन हमारे जमीन पर घुस गया है क्या?प्रधान मंत्रीजी इस संघर्ष के घडीमे देश आपके साथ है लेकीन सच क्या है? बोलो.कुछ तो बोलो. देश सच जानना चाहता है. जय हिंद!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement