एक्स्प्लोर
'शिव व्यापारी सेने'शी शिवसेनेचा संबंध नाही : उद्धव ठाकरे
शिव व्यापारी सेनेच्या तक्रारी वारंवार उद्धव ठाकरेंकडे येत होत्या. त्यानंतर शिवसेनेचा या संघटनेशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : ‘शिव व्यापारी सेने’शी शिवसेनेचा संबंध नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिव व्यापारी सेनेच्या तक्रारी वारंवार उद्धव ठाकरेंकडे येत होत्या. त्यानंतर शिवसेनेचा या संघटनेशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही वर्षांपासून चिंटू शेख हा शिव व्यापारी सेना चालवत होता. चिंटू शेखचं पाच वर्षांपूर्वीचं नितेश राणे गोळीबार प्रकरण गाजलं होतं. चिंटू शेखने या गोळीबारप्रकरणी नितेश राणेंविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली होती.
या संघटनेकडून खंडणी वसूल करणे, त्रास देणे अशा अनेक तक्रारी उद्धव ठाकरेंना मिळाल्या होत्या. या संघटनेचा शिवसेनेशी संबंध आहे, असाही समज अनेकांच्या मनात होता. मात्र या संघटनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement