एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्थानिक स्वराज्यसंस्थेत शिवसेना स्वबळावर, भाजपशी युती नाही: सूत्र
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज 'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समजते आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निर्णय झाला असला तरीही मुंबई महापालिका निवडणुकीबाबत कोणतेही स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.
काही गोष्टी गोपनीय राहू द्या: संजय राऊत
दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, 'ही पक्ष संघटनेची बैठक होती, काही गोष्टी गोपनीय असतात. त्या गोपनीय राहू द्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली. पण त्याबाबत उद्धव ठाकरे आपल्याशी संवाद साधतील. त्यामुळे याबाबत मी बोलणं उचित नाही.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
राजकारण
Advertisement