एक्स्प्लोर
'मोदी मोदी', भाजपच्या घोषणा, शिवसेना म्हणते चोर है चोर है
मुंबई: जीएसटी प्रणाली अंतर्गत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेला पहिला धनादेश प्रदान करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा 647.34 धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मात्र याच कार्यक्रमात शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. पालिका सभागृहात शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.
भाजपा नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. तर त्याला उत्तर म्हणून शिवसेना नगरसेवकांनी 'चोर है चोर है' च्या घोषणा दिल्या.
महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आहेत. त्यांच्याच समोर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याने, दोन्ही नेत्यांसमोर मोठी अडचणी निर्माण झाली.
या कार्यक्रमासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर , शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापालिका आयुक्त यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत.
या कार्यक्रमात आधी सुधीर मुनगंटीवार यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे बोलण्यासाठी उभे राहिले असता, भाजप नगरसेवक थेट उठून गेले.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर शिवेसेना-भाजप नगरसेवकांची चक्क हातघाई झाली. भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसेना नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आली. महापालिकेच्या लॉबीमधे ही मारहाण झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement