एक्स्प्लोर
5 ते 6 जागांवरुन युतीचं ब्रेक-अप होणार?

मुंबई: विधानसभेप्रमाणेच 5 ते 10 जागांच्या वाटाघाटीवर शिवसेना- भाजप युतीचं ब्रेकअप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेशी घासाघीस करुन भाजपने 114 जागांची मागणी लावून धरली असली, तरीही भाजप 105 जागांवर समाधानी होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना 95 ते 100 च्या आसपास जागा सोडण्यास तयार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचं 171:117 असं जागावाटपाचं सूत्र ठरलेलं होतं. मात्र लोकसभेच्या यशानंतर भाजपने 50:50 म्हणजे 144:144 चा दावा केला होता. पण शिवसेनेनं आधीच 150 ची घोषणा केली होती. त्यामुळे अवघ्या 5 ते 6 जागांवरून युतीची बोलणी फिस्कटली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता महापालिका निवडणुकीतही होते की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान आज दोन्ही पक्षांमध्ये जागांच्या याद्यांची देवाणघेवाण होणार आहे. संबंधित बातम्यामुंबई भाजप युवा मोर्चाकडून 92 जागांची मागणी
बायकोच्या तिकिटासाठी नवरोबांची धावपळ
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
आजी-माजी 7 महापौरांची मुंबईसाठी फिल्डिंग!
युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला
महापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा
राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना
मुंबईत भाजप-शिवसेना युतीची शक्यता धूसर: रामदास आठवले
आणखी वाचा























