एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता निर्णय मुख्यमंत्र्यांचा, युतीची चर्चा थांबल्याचे शिवसेनेचे संकेत
मुंबई: आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका मांडावी, असं म्हणत, शिवसेना नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबल्याचे संकेत दिले आहेत.
एकीकडे भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करत आहेत. हा भाजप नेत्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्यं थांबवावी असा इशारा अनिल परब यांनी दिला.
आमची नाराजी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे व्यक्त केली आहे. पक्षप्रमुखांवर आरोप होत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असं परब म्हणाले.
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
एका बाजूला मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे त्यांचे नेते आरोप करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. नेते आरोप करत असतील तर मुख्यमंत्र्यांचं त्यांना समर्थन आहे का, नसेल तर त्यांना आवर का घालत नाहीत, असे प्रश्न आहेत, असं परब यांनी नमूद केलं. शिवसेनेने 'सामना'तून भाजपच्या कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केली नाही. गेल्या दोन वर्षात भाजपच्या 13 जणांवर विविध आरोप झाले. युतीच्या चर्चेसाठी येत असलेल्या विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि आशिष शेलार यांच्यावरही आरोप आहेत. त्यामुळे जर आम्हाला पारदर्शकतेची सुरुवात करायची असती, तर तिथून केली असती, असा पलटवार अनिल परब यांनी केला. आमची संयमाची भूमिका आहे, मात्र भाजप नेत्यांनीही संयम पाळावा. आम्ही आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. आता निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे, असं म्हणत अनिल परब यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे. संबंधित बातम्याआता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणं काळ्या धनापेक्षाही वाईट : सामना
VIDEO: 'बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना आवरा', अनिल देसाईंचा भाजपला इशारा
जिथं भाजपचा आमदार तिथं शिवसेनेनं जागा सोडाव्या, भाजपची मागणी: सूत्र
भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब
बायकोच्या तिकिटासाठी नवरोबांची धावपळ
आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब
आजी-माजी 7 महापौरांची मुंबईसाठी फिल्डिंग!
युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला
मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते कर नाही : भाजप
माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही, सोमय्यांचा घणाघात
मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार
भाजपचा एक्स्क्लुझिव्ह सर्व्हे एबीपी माझाच्या हाती!
5 ते 6 जागांवरुन युतीचं ब्रेक-अप होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement