एक्स्प्लोर
मुंबईकरांसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर
मुंबई : शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला आहे. महिन्याभराने सर्व महापालिकांवर सेनेचा भगवा फडकलेला दिसेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. बाळासाहेबांचा जन्मदिन हा वचननामा जाहीर करण्याचा योग्य दिन आहे, असं ते म्हणाले.
शिवसेनेसाठी 23 तारीख महत्वाची आहे. त्यामुळे आज आम्ही वचनबद्ध होत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 'बोलतो ते करुन दाखवतो', या टॅग लाईनखाली सेनेने आपला वचननामा जाहीर केला.
पक्षात माफियांना घेऊन फिरणारे माफियांबद्दल बोलतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच शिवसेनेवरच्या सर्व आरोपांना खणखणीत उत्तर देऊ, असंही त्यांना ठणकावून सांगितलं.
काय आहे सेनेचा वचननामा?
- 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट
- ई-वाचनालय
- आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र
- महापालिकेच्या विद्यार्थ्यांना महापालिकेत नोकरीस प्राधान्य
- महापालिकेची संगीत अकादमी उभारणार
- उद्यानांची पुनरउभारणी
- जेष्ठ विरंगुळा केंद्र
- बहुरुग्ण वाहिका
- आरोग्य सेवा आपल्या दारी, वृद्ध रुग्णांना घरी जाऊन उपचार देणार
- सार्वजनिक स्वच्छता गृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन
- मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना
- पूर्व उपनगरात गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार
- जेनेरीक मेडिसिनची दुकाने उघडणार
- सार्वजनिक स्वच्छतागृह वाढवणार
- देवनार डंम्पिंग ग्राऊंड येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार
- मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार
- रात्रीसुद्धा कचरा उचलण्याची सोय करणार
- मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी गारगाई, पिंजाळ हे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार
- जुन्या विहीरींचं पुनरुज्जीवन करणार
- वृक्षसंवर्धनासाठी उपाययोजना
- आरे कॉलनीचं हरीतपट्टा आरक्षण कायम करणार
- खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार
- बेस्ट कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच
- शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवास
- डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन
- रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्टँड उभारणार
- सफाई कामगारांना अद्ययावत साधनं देणार
- महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच
- चार मोठे जलतरण तलाव बांधणार
- मुंबई महापालिका आणि बेस्टचा अर्थसंकल्प एकत्र करुन मांडणार
- बस, मेट्रो आणि लोकलसाठी एकच संयुक्त पास इतर विभागांशी पाठपुरावा करुन सुरु करणार
- मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या छोट्या बसेस धावतील
- शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी जागा
- सफाई कामगार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना
- गावठाण आणि कोळीवाड्यातील मूळ बांधकामे अधिकृत करणार
- नरिमन पॉईंट ते दहिसर हा कोस्टल रोड परवानग्या मिळवून पूर्ण करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement