एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे
भाजपचे ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्तिगत पातळीवर अगदी खालच्या दर्जाची टीका केली होती. ही बाब शिवसैनिक विसरलेले नाहीत.
![किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे Shivsaink never forget kirit somaiya's cirtcism of Shivsena : Rahul Shewale किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/18112638/Rahul-Shewale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
9) राहुल शेवाळे (शिवसेना खासदार, मुंबई दक्षिण ) 474 प्रश्न
मुंबई : भाजपचे ईशान्य मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्तिगत पातळीवर अगदी खालच्या दर्जाची टीका केली होती. ही बाब शिवसैनिक विसरलेले नाहीत, त्यामुळे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ईशान्य मुंबई मतदार संघाबाबत निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
राहुल शेवाळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत म्हणाले की, "किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदार संघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे."
दरम्यान दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे. या मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे दोघेही आग्रही होते. परंतु आठवले यांनी माघार घेतली असून शेवाळेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)