एक्स्प्लोर

ED Raids on Anil Parab : अनिल परबांच्या मालमत्तांवरील ईडीच्या धाडीनं शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता?

ED Raids on Shiv Sena Leader Anil Parab : अनिल परबांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थ. राजकीय वर्तुळात रंगल्या जोरदार चर्चा.

ED Raids on Shiv Sena Leader Anil Parab : महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह इतर पाच ठिकाणी काल सकाळी ईडीनं धाड टाकत चौकशी केली. काल शिवसेनेच्या (Shiv Sena) महत्वाच्या नेत्याचा मालमत्तेवरच टाकण्यात आलेल्या धाडीनं शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. नेते चिंतेत आहेत, अशी चर्चा आहे.  

अनिल परब यांची काल तब्बल तेरा तास ईडीनं चौकशी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी "अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता अनिल परब यांनीही बॅगा तयार ठेवाव्यात.." असं खळबळजनक विधान केलं आहे. आतापर्यंत सोमय्या यांनी ज्या नेत्यांची नावं घेतली त्यांना तुरुंगवारी करावी लागली आहे. त्यामध्ये आता परब यांचं नाव सोमय्यांनी घेतल्यानं परब यांच्यावर पुढील काळात कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सोमय्या यांच्या विधानांना अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

दापोलीतील अवैद्य रिसॉर्ट बांधकामा संदर्भात ईडीच्या या कारवाईमुळं परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या अनिल परब यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्यांवर धाड टाकल्यानं शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आगे. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेनं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकत कारवाई केली होती. त्यात आता परब यांच्यापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी लागल्यानं शिवसेना नेते चिंतेत आणि अस्वस्थ झाले असल्याची चर्चा आहे.

ईडीच्या रडारवर आतापर्यंत शिवसेनेचे कोण कोण? 

अनिल परब 

अनिल देशमुख चौकशी प्रकरणी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप लावले आहेत. 

संजय राऊत 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीनं चौकशी केली होती. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. याच प्रकरणी संजय राऊतांच्या संपत्तीही ईडीकडून अटॅच करण्यात आली होती. 

प्रताप सरनाईक 

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

भावना गवळी 

भावना गवळी यांच्या वडिलांचे सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरलं होतं. एवढंच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती. भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. 

अर्जुन खोतकर 

अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून तपासणी करण्यात आली होती. 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. 

आनंदराव अडसुळ 

सिटी बॅंकेच्या माध्यमातून मराठी माणसांची फसवणूक केल्याचा आरोप आनंदराव अडसुळांवर लावण्यात आला आहे. सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यासाठी अडसूळांनी कमिशन घेतल्याचा आरोप आहे. 

काल सकाळपासून रात्रीपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री परब यांचं निवासस्थान तसेच इतर ठिकाणी चौकशी केली. मुंबईसह राज्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र शिवसेनेत यामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. कारण अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचे फार जवळचे मानले जातात. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू मंत्र्यांपैकी एक आहेत. या विश्वासू शिलेदारावरच आता संकट आल्यानं शिवसेनेत चिंता आणि अस्वस्थता वाढल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता अनिल परब यांनीही बॅगा तयार ठेवाव्यात, असं वक्तव्या सोमय्यांनी कारवाईपूर्वीच केल्यानं या कारवाईकडे आता संशयानं ही पाहिलं जात आहे.

अनिल परब यांच्यावर कारवाईनंतर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. अनिल परब आमचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजकीय सूडबुद्धीनं अशा प्रकारच्या कारवाया सुरु आहेत. अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर आरोप लावले जात आहेत. त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सर्वजण, पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. परब यांच्यावरील धाडीनंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सूड बुद्धीनं कारवाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र परबांवरील धाडीनं शिवसेनेतील नेते चिंतेत आणि अस्वस्थ आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20  April 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Temperature : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पारा वाढलेलाचTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 20 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
Embed widget