एक्स्प्लोर
शिवसेना नगरसेवक दिनेश पांचाळही भाजपत

मुंबई: शिवसेनेत अपेक्षाप्रमाणे बंडाळी आणि नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. कारण लालबाग-परळमधील हुकमी एक्का नगरसेवक नाना आंबोले हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर शिवसेनेला गळती लागली आहे. खासदार पत्नीला तिकीट दिल्यानं शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी भाजपप्रवेश केला आहे. त्यानंतर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. मुलुंडमधील शिवसेनेचे नेते, माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी भाजप प्रवेश केला. तर तिकडे नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आहे. खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना अणुशक्ती नगर वॉर्ड १४४ मधून शिवसेनेनं तिकीट दिलं आहे. त्यामुळे दिनेश पांचाळ यांनी भाजपप्रवेश केला. दरम्यान भाजपकडून दिनेश पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना सोडलेले नगरसेवक नाना आंबोले - लालबाग परळ दिनेश पांचाळ - अणुशक्ती नगर प्रभाकर शिंदे - मुलुंड अमेय घोलेंच्या उमेदवारीला विरोध युवा सेना कोषाध्यक्ष आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले यांना वडाळा वॉर्ड क्र. 178 मधून उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध होत आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शिवसेना शाखेला टाळं ठोकलं. इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. रातोरात एबी फॉर्मचं वाटप मुंबई पालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त 2 दिवस उरले असताना शिवसेनेनं रातोरात 150 एबीफॉर्मचं वाटप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विभाग प्रमुखांच्या माध्यमातून उमेदवारांना या फॉर्मचं वाटप झालं. शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून ते आज अर्ज भरण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या
शिवसेनेचा हुकमी एक्का भाजपमध्ये, नाना आंबोलेंचा जय महाराष्ट्र
शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी
मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
आणखी वाचा























