एक्स्प्लोर
शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं निधन
प्रकृती अस्वास्थामुळे प्रल्हाद ठोंबरे यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई: शिवसेनेचे सायन प्रतीक्षा नगर वार्ड क्रमांक १७३ चे विद्यमान नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थामुळे प्रल्हाद ठोंबरे यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने, त्यांची प्राणज्योत मालवली.
ठोंबरे यांच्या निधनामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. प्रल्हाद ठोंबरे हे एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष होते.
यापूर्वी काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचंही निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे प्रभाग क्र. ११६मध्ये (भांडुप पश्चिम) झालेल्या पोटनिवडणुकीत, भाजपच्या जागृती पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता.
याशिवाय भाजपच्या चारकोपमधील वॉर्ड 21 च्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचंही निधन झालं होतं. त्यांच्या जागी पोटनिवडणुकीत त्यांची सून प्रतिभा गिरकर निवडून आल्या.
मुंबई महापालिकेसाठी फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या होत्या.
बहुमतापासून शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष दूर राहिल्यानं नवा संघर्ष सुरु झाला. त्यात शिवसेनेने अपक्षांना साथीला घेतलं. इतकंच नाही तर मनसेच्या सहा नगरसेवकांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
- शिवसेना – 84+4 अपक्ष + मनसेतून आलेले 6 =94 - 1 (प्रल्हाद ठोंबरे) = 93
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 85 + भांडूप पोटनिवडणूक विजय = 86
- कॉंग्रेस - 30
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9
- मनसे - 7
- सपा - 6
- एमआयएम - 2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement