एक्स्प्लोर

राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेना-भाजपची भिवंडीत युती

शिवसेनेकडे एकूण 23 सदस्य व भाजपकडे 19 सदस्य होते. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेना-भाजपच्या केंद्रातील युतीमुळे स्थानिक पातळीवर त्यावेळेसच शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी पंचायत समितीचा फॉर्म्युला ठरवला होता.

भिवंडी : राज्यातलं राजकारण बाजूला ठेवत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे शिवसेना-भाजप भिवंडी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही शिवसेनेने भाजपशी घरोबा करत सामंजस्याने निवडणुका टाळून बिनविरोध निवडणूक पार पाडली.

शिवसेनेने सभापती पद आपल्याकडे ठेवले असले तरी उपसभापती पद भाजपला सोडले आहे. भिवंडी पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे विकास अनंत भोईर तर उपसभापतीपदी भाजपचे जितेंद्र शाम डाकी यांची वर्णी लागली आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमुळे दोन्ही पक्षांकडून एक एक अर्ज आला असल्याने पिठासन अधिकारी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

भिवंडी पंचायत समितीत 42 सदस्य असून शिवसेना 20, भाजपा 19, काँग्रेस 2, मनसे 1 सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. त्यातच महायुतीमुळे काँग्रेसचे दोन व मनसेचा एक सदस्य देखील आता शिवसेनेसोबत होते. त्यामुळे शिवसेनेकडे एकूण 23 सदस्य व भाजपकडे 19 सदस्य होते. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेना-भाजपच्या केंद्रातील युतीमुळे स्थानिक पातळीवर त्यावेळेसच शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी पंचायत समितीचा फॉर्म्युला ठरवला होता, जो आजच्या निवडणुकीत समोर आला आहे.

राज्यात सध्या शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात दंड थोपटत असूनही भिवंडीत त्याचा काहीच परिणाम दिसला नाही. राज्याच्या राजकारणाला बाजूला सारत शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार युती करत सभापतीपदी सेनेचे विकास भोईर तर उपसभापतीपदी भाजपचे जितेंद्र डाकी यांची वर्णी लावत ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. विशेष म्हणजे नवनिर्वाचित सभापती उपसभापतींना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना-भाजपच्या वरिष्ठांनी भिवंडी पंचायत समितीत हजेरी लावली होती.

Politics | ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा पैजा लागल्या; रोखठोकमधून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
Embed widget