एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा!
शिवाजी कदम हे वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज होते.
![भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा! Shiv Sainiks controversy over branch chief designation latest updates भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/11213347/shivsena.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेनेतील नव्या नियुक्त्यांवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली. शाखाप्रमुख पदावरुन दोन गटातील शिवसैनिक एकमेकांना भिडले.
एकीकडे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची घोषणा करुन हिंमतीने लढण्याची भाषा केली, तर दुसरीकडे शिवसैनिकच एकमेकांच्या जीवावर उठल्याची चित्र आहे.
घाटकोपर पश्चिममधील शाखा क्र. 129 च्या बाहेर शिवसैनिक भिडले. या शाखेच्या विभागात प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची या पदावर निवड झाली.
शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज होते. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांच्या गटांमध्ये भांडण झालं.
पाहा व्हिडीओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion