एक्स्प्लोर

कावळ्यांची नाही तर मावळ्यांची चिंता करावी : शरद पवार

निवडणुकीला सामोरे जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने करण्याचा विचार केला जाईल, असे पवार म्हणाले.

मुंबई : आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार?, अशा शब्दात पवार यांनी सरकारवर टीका केली. निवडणुकीला सामोरे जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने करण्याचा विचार केला जाईल, असेही पवार म्हणाले. राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचे हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. येत्या 20 तारखेला मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल यात शासनाने मदत केली तर ठीक, नाहीतर रस्त्यावर उतरण्याचे काम केले जाईल. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोकं विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही पवार म्हणाले. देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मत करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचे आहे. यातून पक्षाला फायदा आहेच त्यासोबतच राज्याला देखील मोठा फायदा आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर हे आज गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. आपले मुख्यमंत्री हे तिथलेच. या साऱ्यांविरोधी आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत आज महिला कार्यकर्त्यांचा उत्तम निर्धार जाणवला असल्याचे देखील शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget