एक्स्प्लोर

विधानसभेसाठी राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरु, शरद पवारांचे संकेत

ज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पीढीचा आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता, असं शरद पवारांनी म्हटलं.

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरेंच्या सभेतील 'लाव रे तो व्हिडीओ'चा करिष्मा दिसू लागला आहे. लोकसभा निवडणुकीतील सभांमुळे राज ठाकरेंचं राजकीय वजन नक्कीच वाढलं आहे. कारण विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शरद पवारांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र आपली भूमिक बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं भाजपसोबत युती केली. एवढ्या आरोप-प्रत्यारोपानंतर शिवसेना-भाजपच्या युतीमुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचं शरद पवारांनी म्हटलं. बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकांवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. बाळासाहेबांचं तेच प्रतिबिंब आज राज ठाकरेंमध्ये दिसत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.

राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पीढीचा आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. त्यामुळे बाळासाहेबांना निवडणुकीत लगेच पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागणार आहे. राज ठाकरेंशी आमची याबाबत चर्चा झालेली नाही. मात्र राज ठाकरेंना आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचं राज्यातील सरकार घालवण्यासाठी जी समीकरणं जुळवावी लागतील, त्याचा विचार केला जाईल. अशारीतीने विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याचा गांभीर्यानं विचार सुरू असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले; शंकर महादेवन अन् सोनाली कुलकर्णींच्या गळ्यात माळ
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले; शंकर महादेवन अन् सोनाली कुलकर्णींच्या गळ्यात माळ
6 places in India where entry is not allowed : काश्मीर पर्यटनाची चर्चा रंगली, पण देशात या 6 सुंदर ठिकाणी तुम्ही ‘भारतीय’ असला तरी नो एन्ट्री!
काश्मीर पर्यटनाची चर्चा रंगली, पण देशात या 6 सुंदर ठिकाणी तुम्ही ‘भारतीय’ असला तरी नो एन्ट्री!
अश्लील कंटेंटच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि 9 ओटीटी-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस
अश्लील कंटेंटच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि 9 ओटीटी-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस
Solapur APMC Election Result: गुलाल आमचाच... सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर फडणवीसांचा पठ्ठ्याच वरचढ; बाजार समितीत सचिन कल्याणशेट्टींचा मोठा विजय
गुलाल आमचाच... सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर फडणवीसांचा पठ्ठ्याच वरचढ; बाजार समितीत सचिन कल्याणशेट्टींचा मोठा विजय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAtul Kulkarni at Kashmir : पर्यटकांमध्ये भीती मात्र अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये! 28 April 2025India, France ink Rs 63,000-crore deal : भारत-फ्रान्समध्ये राफेल करार; पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्वMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 28 April 2025 : 4 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले; शंकर महादेवन अन् सोनाली कुलकर्णींच्या गळ्यात माळ
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले; शंकर महादेवन अन् सोनाली कुलकर्णींच्या गळ्यात माळ
6 places in India where entry is not allowed : काश्मीर पर्यटनाची चर्चा रंगली, पण देशात या 6 सुंदर ठिकाणी तुम्ही ‘भारतीय’ असला तरी नो एन्ट्री!
काश्मीर पर्यटनाची चर्चा रंगली, पण देशात या 6 सुंदर ठिकाणी तुम्ही ‘भारतीय’ असला तरी नो एन्ट्री!
अश्लील कंटेंटच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि 9 ओटीटी-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस
अश्लील कंटेंटच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि 9 ओटीटी-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस
Solapur APMC Election Result: गुलाल आमचाच... सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर फडणवीसांचा पठ्ठ्याच वरचढ; बाजार समितीत सचिन कल्याणशेट्टींचा मोठा विजय
गुलाल आमचाच... सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर फडणवीसांचा पठ्ठ्याच वरचढ; बाजार समितीत सचिन कल्याणशेट्टींचा मोठा विजय
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने पूर्ण, मंत्रालयातील पाटी निघेना, कार्यालयही रिक्त; चर्चा तर होणारच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने पूर्ण, मंत्रालयातील पाटी निघेना, कार्यालयही रिक्त; चर्चा तर होणारच
अजित पवार गटाला 'दे धक्का', आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील
अजित पवार गटाला 'दे धक्का', आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील
Congress on PM Modi : आधी पुलवामा, आता पहलगाम; मोदीजी एका मुंडक्याच्या बदल्यात 100 मुंडकी कधी येणार, त्या आश्वासनांचे काय झाले? पीएम मोदींना करडा सवाल
आधी पुलवामा, आता पहलगाम; मोदीजी एका मुंडक्याच्या बदल्यात 100 मुंडकी कधी येणार, त्या आश्वासनांचे काय झाले? पीएम मोदींना करडा सवाल
India Vs Pakistan army: कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?
कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता अन् पाकिस्तानी लष्करात धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?
Embed widget