एक्स्प्लोर
मुंबईतील शिवसेना नगरसेविकेला लाचखोरीप्रकरणी ACB कोठडी
मुंबई : शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील नगरसेविका हेमांगी चेंबुरकर आणि त्यांच्या सचिवाला सत्र न्यायालयाने एसीबी कोठडी सुनावली. कारवाई टाळण्यासाठी हेमांगी चेंबुरकरांनी हॉटेल मालकाकडून 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 16 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने हेमांगी चेंबुरकरांना रंगेहात अटक केली.
मुंबई सत्र न्यायालयाने शिवसेना नगरसेविका हेमांगी चेंबुरकर आणि त्यांचा सचिव राजाराम रेडकर यांना शनिवारपर्यंत एसीबी कोठडी सुनावली आहे.
प्रकरण काय आहे?
हेमांगी चेंबुरकर या मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 199 च्या नगरसेविका आहेत. तिथल्या एका हॉटेल मालकाविरोधात वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी हेमांगी चेंबुरकरांनी हॉटेल मालकाकडे 25 हजारांची लाच मागितली.
दरम्यान, 25 हजार रुपयांपैकी 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं हेमांगी आणि त्यांच्या सचिवाला अटक केली.
संबंधित बातमी : मुंबईत शिवसेनेच्या नगरसेविकेला लाच घेताना रंगेहाथ अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement