एक्स्प्लोर
लग्नासाठी सुट्टी न मिळाल्याने RPF जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या
मुंबई : स्वतःच्या लग्नासाठी वरिष्ठांनी सुट्टी नाकारल्याने आरपीएफ जवानाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय दलवीर सिंहने काल मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी हा आरोप केला आहे.
जानेवारी महिन्यात दलवीरचा साखरपुडा झाला. यानंतर लग्नातील अन्य विधींसाठी 6 मार्चपासून सुट्टी न मिळाल्याने तो तो नाराज होता, अशी माहिती दलवीरच्या कुटुंबियांनी दिली.
रेल्वेतील अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दलवीरच्या मागणीनुसार त्याला 11 मार्चपासून 5 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती, असं सांगत वरिष्ठांनी दलवीरच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळले आहेत.
मूळ हरियाणाचा असलेला दलवीर 2015 पासून मुंबईत सेवेत रुजू झाला. शनिवारी त्याच्यासह पाच जवानांची ड्युटी गुजरात मेलमध्ये होती. मात्र त्यापूर्वी मुंबई सेंट्रल स्थानकावरील कार्यालयातच त्याने गोळी झाडून आत्महत्या केली.
संबंधित बातमी : मुंबई सेंट्रल स्टेशनवरच RPF जवानाची गोळी झाडून आत्महत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement