एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

घाटकोपर दुर्घटनेची पारदर्शक चौकशी करा, नितेश राणेंची मागणी

घाटकोपर दुर्घटनेची चौकशी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखालील समितीमार्फत करावी, अशी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

मुंबई : घाटकोपर दुर्घटनेची चौकशी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखालील समितीमार्फत करावी, अशी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. घाटकोपर येथील साईदर्शन इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला सुनील शितपइतकेच मुंबई महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे चौकशी समितीत पालिकेचे अधिकारी असतील तर ते अधिकारी दोषी अधिकाऱ्यांना वाचविण्याच्या दृष्टीने अहवाल तयार करतील, अशी अशी शंका काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी एखादे निवृत्त न्यायाधीश, आयएएस अधिकारी, किंवा सीआयडी मार्फत पारदर्शकपणे करावी अशी मागणी आमदार नितेश राणे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. “घाटकोपर येथील साईदर्शन इमारत दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सुनील शितप याला एकट्याला का दोषी मानायचे? कायद्याचा कोणी घाबरत नाही तर बीएमसीला कोणी गांभीर्याने घेत नाही. सर्वांनाच माहीत आहे बीएमसीमध्ये सर्वच गोष्टी पैशाने मॅनेज होतात” अशी खंत आमदार नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. “सुनिल शितप आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संग्नमातने पूर्णबांधणीचे काम सुरू होते, त्यामुळे शितप सोबत अधिकारीही या घटनेला तितकेच जबाबदार आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही धाक राहीला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर निलंबनाची, बडतर्फीची कारवाई करावी जेणेकरून त्यांच्यात धाक निर्माण होईल”, असं आमदार नितेश राणें यांनी म्हंटलं. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी विरोधी पक्षाकडून 97 अन्वये विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेच्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. नितेश राणे यांच्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल पंधरा दिवसात येणार आहे. मात्र, ही समिती एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करून त्याविषयीचा अहवाल तयार करेल असे जाहीर आश्वासन दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget