एक्स्प्लोर
शिवसेना-भाजपची युतीसंदर्भातील तिसरी बैठक, वेळ आणि ठिकाण ठरलं!

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीसंदर्भातील शेवटची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये संध्याकाळी 5 वाजता शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बैठक होईल. शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब आणि रविंद्र मिर्लेकर उपस्थित राहणार आहेत. तर भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांची उपस्थित राहणार आहेत. शिवेसेन-भाजपमध्ये आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. त्यामुळे या चर्चेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या बैठकीनंतर मोठी घोषणा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक























