एक्स्प्लोर

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय

केंद्र सरकारने 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग 21 सप्टेंबरपासून करण्याची मुभा दिली असली तरी, महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.

मुंबई : राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिलाय. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडलीय. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केली. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी

21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे अवघड ग्रामीण भागामध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्यास पालकही संमती देणार नाहीत. निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरु करु नये. मागील वर्षी आलेले वेतनेत्तर अनुदान परत गेलंय. हे अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावे, अशी मागणी बैठकीमध्ये केली आहे. संस्थाचालक महामंडळाच्या मागणीची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेऊन 21 सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरु होणार नाही, असे आता स्पष्ट केलं आहे.

शाळेच्या शुल्काबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे. आता शासनाने तसे लेखी निर्देश देणे गरजेचे आहे. विनाअनुदानित शाळांची फी भरण्याबाबत शासनाने निर्देश द्यावे, अशी मागणी या बैठकीमध्ये संस्था चालकांनी केलीय. केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया अर्थात एसओपी जारी केली होती. याअंतर्गत केवळ इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थीच्या शाळा सुरु होणार होत्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये. म्हणून सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षण मंत्र्यांचा निर्णय

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget