एक्स्प्लोर

Sanjay Raut on ED: केंद्रीय यंत्रणांची कार्यालये खंडणीखोर; पुढील आठवड्यात ईडीचा मोठा घोटाळा काढणार; संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut On ED : संजय राऊत यांनी पुढील आठवड्यात ईडीचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut On ED : पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी आज ट्वीट करून ईडी अधिकाऱ्याच्या बेनामी संपत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईडी आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांचे बाण सोडले. भाजपने मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालये खंडणीखोर केली असल्याची घणाघाती टीकाही राऊत यांनी केली. 

शिवसेना भवनात आज शिवसेना खासदार विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतही सहभागी झाले. यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. पालघरमध्ये 260 कोटींचा प्रकल्प सुरू आहे. हा प्रकल्प सोमय्यांच्या मुलाच्या नावावर असून त्यांची पत्नी संचालकपदावर आहे. या प्रकल्पात ईडीच्या एका अधिकाऱ्याची बेनामी संपत्ती गुंतली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. दररोज किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुढील आठवड्यात ईडीचा घोटाळा

मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालये ही खंडणीखोर बनवली असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्राला कसे लुटले, कोट्यवधींची अफरातफर केली याची सगळी माहिती उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. कुणाला आमच्या आंगावर यायचं असेल त्यांनी जरूर यावं. एक दिवस त्यांना या ठिकाणाहून तोंड काळे करून जावं लागेल. आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक ईडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याचं ठिकाणी बसून बाहेर काढणार आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. गुन्हेगारीचे हे सिंडिकेट उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

पोकळ धमकी देऊ नये

कुंडली काढण्याची धमकी आम्हाला कोणी देऊ नये. आमच्याकडेही तुमच्या कुंडल्या आहेत, अशा इशाराही त्यांनी दिला. आम्हाला कोणी पोकळ धमकी देऊ नये. कितीही ईडी, सीबीआय मागे लावा आम्ही त्याला  उत्तर देण्यास सज्ज आहोत.आम्ही रिश्ते में आप आपके बाप लगते हैं आणि तुम्हाला बाप दाखवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्र्याचा घोटाळा काढण्यास मदत करा

केंद्रीय मंत्र्यांचा 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला होता. त्यामध्ये आम्हाला साथ द्या असे आवाहनही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना केले.  आता ज्याप्रकारे तुम्ही शेपूट घालून बसले आहात ते सोडून बाहेर पडा असेही राऊत यांनी सोमय्यांना म्हटले. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget