Kurla : कुर्ला विधानसभेतून प्रविणा मोरजेकरांना उमेदवारी देऊ नका, संभाजी ब्रिगेडचे उद्धव ठाकरेंना पत्र
Sambhaji Brigade : मराठा समाजाच्या लोकांवर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या उमेदवारीला संभाजी ब्रिगेडने विरोध केलाय.
![Kurla : कुर्ला विधानसभेतून प्रविणा मोरजेकरांना उमेदवारी देऊ नका, संभाजी ब्रिगेडचे उद्धव ठाकरेंना पत्र Sambhaji Brigade opposed Pravina Morjekar from Kurla Assembly wrote letter to Uddhav Thackeray Kurla : कुर्ला विधानसभेतून प्रविणा मोरजेकरांना उमेदवारी देऊ नका, संभाजी ब्रिगेडचे उद्धव ठाकरेंना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/08/4479428db65ef40ac1e1a3cc5f984c811723132199252426_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून काही दिवसांपूर्वी कुर्ल्यामधून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्याला आता संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजाच्या लोकांवर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या संदर्भात मुंबईच्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पत्र लिहून याची दखल घेण्याची मागणी केली आहे.
माजी नगरसेविका प्रविणा मनिष मोरजकर यांनी त्यांच्या नगरसेविकेच्या कार्यकाळात मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचाआरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला आहे.
ॲट्रॉसिटीसारख्या कलमांचा चुकीचा वापर करून मराठा समाजाला बदनाम करण्याचे काम प्रविणा मोरजकर यांनी सुरू असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला.मराठा समाजातील तरूणांना खोट्या ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवून त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात येत आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)