एक्स्प्लोर

Sadichcha Sane Murder: सदिच्छाच्या मृतदेहाचे सर्च ऑपरेशन थांबवले; मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा, वडिलांचं वक्तव्य

sadichha Sane : पोलिसांनी नौदलाच्या माध्यमातून सदर ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. मात्र दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली

Sadichha  Sane Murder : वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली आरोपी मितू सिंहने दिली आहे. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचंही आरोपीने कबूल केले आहे. दरम्यान याप्रकरणी वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात सदिच्छा सानेचा मृतदेह शोधण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं होतं. मात्र तिचा मृतदेह हाती न लागल्याने आज नौदलाकडून शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.

एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मितू सिंह सातत्याने मागचा दीड वर्षात आपला जबाब बदलत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच खून केल्याची कबुली तर दिलीच शिवाय ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. आज सकाळपासूनच पोलिसांनी नौदलाच्या माध्यमातून सदर ठिकाणी शोधमोहीम सुरु केली. मात्र दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली आणि पुन्हा एकदा नव्याने दुसऱ्या यंत्रणांच्या माध्यमातून शोध मोहीम करणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली

सदिच्छाची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा, वडिलांचा आरोप 

दरम्यान सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे, असा आरोप सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी केला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मागील 14 महिन्यांपासून आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याच सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंह यांनी माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही? तसंच तिच्याजवळ असलेलं साहित्य अजून पोलिसांना का मिळालं नाही? असे सवाल उपस्थित करत या प्रकरणात योग्य तपासणी करुन कारवाई केली जावी अशी मागणी सदिच्छाचे वडील मनीष साने यांनी केली आहे.

29 नोव्हेंबर 2021 ला सदिच्छा झाली होती गायब 

दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघरमध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget