एक्स्प्लोर

Sachin Vaze Case : सचिन वाझे प्रकरणात 'संशयित महिले'ची एन्ट्री; ओळख पटवण्यासाठी एनआयएचा तपास सुरु

सचिन वाझे प्रकरणात एका संशयित महिलेचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही संशयित महिला हॉटेल ट्रायडंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहेत.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली होती. अटकेनंतर एनआयएच्या हाती त्याच्याविरोधातील  बरेच महत्वाचे पुरावे लागले आहेत. दक्षिण मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे यांनी तब्बल 100 रात्रींचा मुक्काम केल्याची गोष्ट एनआयएने उघडकीस आणली आहे. सचिन वाझे कामातील आपला बहुतेक वेळ मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये घालवायचे. सचिन वाझे आठवड्यातील 4 ते 5 दिवस ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते. एनआयएच्या तपास पथकाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन शोध घेत तेथील अनेक सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केल्या आहेत. याच तपासणी दरम्यान सचिन वाझे बनावट ओळखपत्र तयार करुन या ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत असल्याचे उघड झाले आहे.

आता तपासात आता एका संशयित महिलेचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही संशयित महिला ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहेत. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण या महिलेने मास्क घातल्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण जात आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पिओमध्ये ठेवलेलं जिलेटिन कमी तीव्रतेचं

लॉबी, लिफ्ट पासून ते रुमपर्यंत जवळपास 35 ते 40 सीसीटीव्ही डीव्हीआर एनआयएने जप्त केल्या आहेत. पण एकदाही या संशयित महिलेने मास्क काढलेला नसल्याचं आढळून आलं. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा पोलीस खात्याशी कोणताही संबंध नसल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. एनआयएला संशय आहे की, या महिलेचे मनसुख हिरण हत्या प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे यांच्याबरोबर जवळचे संबंध असल्याने ती सचिन वाझेसाठी देखील काम करत असवी.

लवकरच एनआयए याविषयी विनायक शिंदे यांचीही चौकशी करु शकते आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गुजरातमधील असल्याचा संशय आहे. 16 फेब्रुवारीला सचिन वाझे आणि ही महिला एकाच कारमधून हॉटेलमध्ये आले होते. पण आधी वाझे हॉटेलच्या आत आले आणि नंतर महिलेने आत प्रवेश केला. यासंबधीतील चौकशीत सचिन वाझे यांनी या महिलेला ओळखण्यास आणि तिच्याबरोबर हॉटलमध्ये असण्यास नकार दिला आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेंचा तब्बल 100 रात्रींचा मुक्काम!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहितीPushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Embed widget